नांदेड येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
नांदेड प्रतिनिधी - वैभव घाटे
अनंत अडचणींवर मात करत सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली. महात्मा जोतिबा फुले यांचे अस्पृश्यता निवारण व समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सामाजिक कार्य त्यांनी निरंतर सुरू ठेवले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, दिनांक: 03 जानेवारी 2023 रोजी. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात त्यांची जयंती साजरी करण्यात आली..!
यावेळी, एम. एस. मुळे, एस.जे. रणभीरकर, व्ही. बी. आडे, संजय पाटील, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, सुनील पतंगे, संजय मंत्रे लहानकर, मोशीन शेख, अनिकेत वाघमारे यांची उपस्थिती होती..!
-