Breaking News
recent

महिलांना सक्षम काम करण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन करीत आहे : भाई जगदीश गायकवाड



  संतोष आमले पनवेल  प्रतिनिधी 

    महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 14 मार्च 2023 रोजी कर्नाळा स्पोर्ट्स टर्फ ग्राउंड येथे महिलांसाठी झाशीची राणी चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे यावेळी महिला पोलीस -डॉक्टर -पत्रकार -वकील-शिक्षिका-नगरसेविका व अन्य क्षेत्रातील महिला यांच्यासाठी अंडर आर्म क्रिकेट सामने खेळवण्यात येणार आहेत. याविषयी बोलताना जगदीश गायकवाड यांनी सांगितले कि हा स्तुत्य असा उपक्रम असून मला झाशीची राणी चषक हे नाव खूप आवडले व फक्त पत्रकारिता न करता समाजाला देखील आपण काही देणे लागतो या हेतूने महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनची कार्ये सुरु आहेत व त्यांना माझे नेहमी सहकार्य राहील असेही भाई जगदीश गायकवाड यांनी सांगितले.



Powered by Blogger.