श्रीगोंदा पोलीसांची कामगीरी तब्बल ४०२१४९ /- रु किंमतीचा गुटखा, तंबाखु, सुगंधी पान मसाला केला जप्त
श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत काष्टी परीसरात महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला सुगंधी पान मसाले, तंबाखु गुटख्याची विक्री होत असले बाबत गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाल्याने दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना काष्टी गावात गुप्त बातमिदारामार्फत मिळालेल्या बातमिचे ठीकाणी छापा कारवाईच्या सुचना दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी काष्टी गावात १)मच्छिंद्र साहेबराव बरकडे याचे काष्टी येथील बालाजी पान शॉप नावाचे टपरीवर २) अहमद इनुस शेख याचे राहते घरी काष्टी ता. श्रीगोंदा ३) प्रदिप राधाकिसन कोकाटे याचे काष्टी येथील कोकाटे पान शॉप व कोकाटे वस्ती येथील राहते घरी छापा कारवाई केली असता त्याचेकडे अनुक्रमे १) १६८८० रुपये, २) २४६८८ रुपये, ३) ३६०५८१ रुपये असा एकूण ४०२१४९ रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला सुगंधी पान मसाले,तंबाखु,गुटखा जप्त करण्यात आला आहे.
त्याच्या विरुध्द अनुक्रमे
1)श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 192/2023 भा.द.वि.कलम 328,188,272,273 तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26(2)(i),26(2)(iv),27(2)e,30(2)(a),3,4,59 प्रमाणे
2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 194/2023 भा.द.वि. कलम 328,188, 272, 273 तसेच अन्न सुरक्षा मानके कायदाकलम 2006 चे कलम 26(2)(i),26(2)(iv),27(2)e,30(2)(a),3,4,59 प्रमाणे
3)श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 197/2023 भा.द.वि.कलम 328,188,272, 273 तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26(2)(i),26(2)(iv),27(2)e,30(2)(a),3,4,59 प्रमाणे दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यातील आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन गुन्हाचा तपास पो.स.ई. समिर अभंग, पो.कॉ साखरे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पो.स.ई.समिर अभंग, पो. हवा रोहीदास झुंजार, पो. ना गोकुळ ईंगावले, पो.कॉ अमोल कोतकर, पो.कॉ प्रताप देवकाते, पो.कॉ गणेश साने, पो.कॉ रविंद्र जाधव, पो.कॉ कुलदिप घोळवे, पो.कॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.