Breaking News
recent

शहापुरात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त 100 कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण



 कल्याण प्रतिनिधी 

   बदलत्या विषमतावादी व्यवस्थेत योग्य समज व सजग असलेला नागरिक घडवणे,त्याच्यात राजकीय, धार्मिक,आर्थिक,शैक्षणिक अशा विविध घटकांची यथासांग जाण आणि भान निर्माण करणे व एक स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्याचा विकास करणे म्हणजेच स्वतःच्या धडावर स्वतःचेच डोके असावे याची त्याला जाणीव करून देणे हे ध्येय घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई शाखा तालुका शहापूर कडून निवडक १०० कार्यकर्त्यांसाठी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने रविवार 25 जून रोजी प्रगती विद्यालय, ठिळे येथे सकाळी १०:०० ते सायं.४:३० या वेळेत 'कार्यकर्ता कसा असावा' या विषयावर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

       कार्यक्रमांपेक्षा कार्यकर्ता घडवणे हे शहापूर शाखेचे प्रमुख उद्दीष्ट असल्याने यावर्षीची शाहू महाराजांची जयंती हि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाने साजरी केली जाणार असल्याची माहिती कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई संस्थेचे ठाणे जिल्ह्यातील आद्य संघटक व शहापूर शाखेचे कार्यकारीणी सदस्य प्रकाश पाटील यांनी दिली.

Powered by Blogger.