Breaking News
recent

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी अतुल पाटील, महेंद्र घरत यांनी घेतली जेएनपीएचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट.



संतोष आमले पनवेल प्रतिनिधी 

    उरण मधील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत.प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील व कामगार नेते महेंद्र घरत यांनी पुढाकार घेतला आहे.स्वर्गीय दी. बा. पाटील साहेब संघर्ष समितीचे समन्वयक अतुल पाटील तसेच रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित साडेबारा टक्के भूखंडासंदर्भात चर्चा केली.यावेळी अनिल डीग्गीकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Powered by Blogger.