रायगड जिल्ह्याला राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत २ पदक
पनवेल प्रतिनिधी
२३ जून व २४ जून रोजी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा र्अँटॉप हिल सायन कोळीवाडा, मुंबई येथे प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख कॅप्टन तमिल सेलव्हन (आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग पदक विजेते) यांच्या उपस्थितीत पार पडली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या महिला गटात रायगडच्या सलोनी मोरे हिने 63 किलो गटात प्रथम येवून सुवर्ण पदक पटकावले तर 47 किलो गटात अमृता भगत ही तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ पदकची मानकरी झाली.संजीवन भास्करन, अध्यक्ष व अर्जुन पुरस्कार विजेते, संदीप सावंत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, संजय सरदेसाई ,सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व श्री.रंगास्वामी, ऑलिम्पियन वेट लिफ्टर, रेल्वे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला. "पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"चे वतीने खेळाडूंचे या यशाबद्दल आनंद व्यक्त करून अध्यक्ष गिरीष वेदक,(पनवेल) सेक्रेटरी अरुण पाटकर तसेच राहुल गजरमल, सचिन भालेराव, माधव पंडित,(रसायनी), सुभाष टेंबे (माणगाव) , संदीप पाटकर, श्रीनिवास भाटे, यशवंत मोकल , दत्तात्रय मोरे, मानस कुंटे या सर्वांनी या दोघींना पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या आहेत.