Breaking News
recent

पालवी ज्ञानमंदिरात योग दिन संपन्न


पंढरपूर प्रतिनिधी.

    पंढरपुरातील पालवी ज्ञानमंदिरात क्रेडाई आणि क्रेडाई वुमन्स विंग पंढरपूर तथा पालवी ज्ञानमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.यादरम्यान योगाचे जनक महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.उपस्थित आशिष शहा यांनी योगाचे महत्त्व पटवून देत योग प्रात्यक्षिकांची सादरीकरण केले.यावेळी वेगवेगळी योगाची आसने विद्यार्थ्यांना शिकविण्यात आली.विद्यार्थ्यांची दररोज नियमित योगाने व व्यायामाने शरीर मजबूत झाली आहेत व रोगप्रतिकारशक्ती छानच वाढली आहे असे उदगार उपस्थितांनी उच्चारले.विद्यार्थ्यांनी देखील हसत खेळ योगाची प्रात्यक्षिक सादर  केले.प्रास्ताविकामध्ये श्री वैभव मोरे यांनी 21 जून व जागतिक योग दिन त्यांचा संबंध व महत्त्व विषद केले.

यावेळी क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष. अमित शिरगावकर, सचिन पंढरपूरकर, शशिकांत सुतार, मिलिंद देशपांडे,श्रेया शिरगावकर, संतोष कचरे, गायत्री कचरे, ऋतुजा शहा, आशिष शहा यांच्यासह मुख्याध्यापक.बाबासाहेब सरकटे, शिक्षक, विद्यार्थी व पालवी सहकारी उपस्थित होते.

Powered by Blogger.