Breaking News
recent

नववधूची गळा आवळून निर्दयी हत्त्या.


तेल्हारा.

            पोलिसांना गंडवण्याचा डाव फसला.तीन आरोपी जेरबंद आणखी आरोपी वाढण्याची शक्यता...

    दहिगाव अवताडे येथील हृदय हेलावून टाकणारी घटना.हत्याकांड तेल्हारा तालुका परिसरातअत्यंत निर्दयी घटना  दहिगाव अवताडे येथे घडली  . मृतक नामे जया मारुती अघडते हीचे वडील मारुती गोविंदा आघडते वय 55 रा. पारडी याच्या  जबानी रिपोर्ट वरून हकिकत अशी की गोपाल समाधान पातोंड राहणार दहिगाव अवताडे येथे एकत्र कुटुंबामध्ये राहत असून माझ्या मुलीचा विवाह माझी की बहीण  देवकाबाई समाधान पातोंड हीचा मुलगा गोपाल समाधान पातोंड याच्यासोबत 2014 मध्ये समाजाच्या रितीरिवादाप्रमाणे आम्ही लग्न लावून दिले होते व तिला एक आठ वर्षाची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा अशी दोन अपत्य आहे माझी मुलगी मृतक जया गोपाल पातोंड अंदाजे जानेवारी 2023 पासून तिचा नवरा गोपाल पातोंड सासरा समाधान पातोंड सासू देवकाबाई पातोंड हे तिघे आरोपी माझ्या मुलीला शेतात जाण्याच्या कारणावरून नेहमी त्रास देत होते मारहाण करत होते शिवीगाळ करत होते ती मला सांगत होती आम्ही तिला मे 2023 मध्ये आमच्या घरी पारडी येथे घेऊन आलो ती आमच्या घरी जवळपास एक महिना राहिली.

    नंतर पुन्हा आमचा जावई आरोपी  गोपाल समाधान पातोंड हा आमच्या घरी पारडी येथे येऊन हात पाय जोडून माफी मागून आमच्या मुलीला दहिगाव येथे घेऊन गेला.मागील 25 दिवसापासून ती दहिगाव येथे गोपाल पातोंड पतीच्या घरी राहू लागली होती. 20,जून 2023 रोजी संध्याकाळी अंदाजे सात वाजताच्या दरम्यान माझा मुलगा सुनील च्या फोनवर मयत माझी मुलगी जया हिचा आरोपी गोपाल पातोंड याच्या फोनवरून फोन आला व तिने मला सांगितले की तिला तिचा नवरा गोपाल समाधान पातोंड तिचा सासरा समाधान किसन पातोंड तिची सासू देवकाबाई समाधान पातोंड हे तिला मारहाण करत आहेत व शिवीगाळ करत आहेत शेतात जाण्याकरता तगादा लावत आहेत मी तिला म्हणालो की मी सकाळीच येतो तोपर्यंत तू शांत रहा. मी 21 जून 2023 रोजी सकाळीच दहिगाव येथे त्यांची समजूत घालण्याकरिता जाण्याचं ठरवलं असता सकाळी दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी सहा वाजता माझा जावई गोपाल पातोंडा फोन आला व त्याने मला सांगितले की मामा तुम्ही उठले का अन जयी मेली ती उठून  राहिली नाही मी पुढे विचारत असतानाच बोलता बोलता फोन कट केला त्यानंतर मी घरातील सगळ्यांना सांगितलं लगेच आम्ही तिथून दहिगावला आलो पोलीस तेथे आलेले होते आम्ही तिथे माझ्या मुलीला मृता अवस्थेत पाहून मला धक्काच लागला मी पाहिलेल्या तिच्या अंगावरच्या जखमा व गळ्याला दिलेला फास हा पोलिसांच्या समक्ष दिसून आला माझा जावई आरोपी गोपाल समाधान पातोंड समाधान किसन पातोंड देवकाबाई समाधान पातोंड यांनी संगणमत करून माझ्या मुलीची मयत जया गोपाल पातोंड.हीची हत्या केली.आहे

                                    मयत जया गोपाल पातोंड हीचा वडिलांच्या जबानी रिपोर्ट वरून

घटनास्थळावरून पोलिसांनी पंचनामा केला पंचनामादरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याकरता प्रेताला अकोला शासकीय महाविद्यालय येथे सेवेचीदन करण्याकरता नेले दिवसभरच्या प्रतीक्षेनंतर चार ते साडेचार च्या दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्ट आला रिपोर्ट नुसार डॉक्टरांनी मयत च्या नातेवाईकांना बोलावून त्यांना हकीकत सांगितले की मुलीचा गळा आवळून खून झालेला आहे तशाप्रकारे रिपोर्ट पण दिला आम्हाला नंतर पोलिसांनी सूत्र हलवत तिघांना तातडीने ताब्यात घेऊन जेरबंद केले. 

                        आरोपी .कलम 302व कलम 34 नुसार गुन्हाची नोंद झाली आहे.

दी.22/ जून रोजी पोलिसांनी पी सी आर करिता तेल्हारा न्यायालय येथे हजर केले असता एक दिवसाचा पीसीआर मिळाला असून या घटनेची कसून चौकशी सुरू असून अकोट येथील एचडीपीओ रितू खोकर यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फळ व त्यांची टीम तपास अधिकारी Asi गणेश कायंदे यांच्या कडे तपास दिला आहे.

आरोपि यांच्या पोलीच कोठडीत वाढ होण्याची शक्यता असून गावात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे .आणखी आरोपी वाढतात की काय याकडे गाव वा शियांचे लक्ष लागले आहे नेमक काय वळण लागते ते तपास पूर्ण झाल्यावर कळेल अशी सर्वत्र परिसरात चर्चा होत आहे .

Powered by Blogger.