जळगाव जामोद व संग्रामपूर येथे दारू जप्त
खामगांव संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथे पोलिसांनी छापा मारून आरोपी अतुल सिध्दार्थ वानखडे याच्या ताब्यातून ५०० रूपये किंमतीची ५ लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदविला. सदर कारवाई पोना गजानन गव्हांदे यांनी केली.
जळगाव जामोद तालुक्यातील चावरा येथे भारत महादेव सोळंके याच्या ताब्यातून नापोकाँ. भागवत उबरहंडे यांनी विनापरवाना ३६० रूपये किंमतीची कोकन देशीदारू जप्त करून पोलिसात गुन्हा नोंदविला.