मलकापुर पाग्रा येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा हाडा घागर मोर्चा
प्रतिनिधी वाघाळा योगेश काकड
मोर्चात सहभागी चार ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे नळ योजनेसाठी दोन कोटी 90 लाख रूपये मंजुर होऊनही मलकापूर पाग्रा येथे 15 ते 20 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे पाणीटंचाई त्रस्त महिलांनी 23 जुन रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोर्चा सहभागी झालेल्या चार ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत गत चार महिन्यापासून मलकापूर पांग्रा येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात 15 ते 20 दिवस एकिका वार्डात नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो होतो दुसरीकडे काही भागात दररोज पाणीपुरवठा होत आहे
पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत महिला व नागरिकांनी हंडा मोर्चा काढला गावातील नळ योजनेसाठी दोन कोटी 90लाख रुपये मिळाले आहेत तरी पिण्याच्या पाण्यासाठी मलकापूर वाशी यांना भटकंती करावी लागते महिलांनी पाणी मिळत नसल्याकारणाने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता शेख हनीफ शेख कदर बागवान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला पाण्यासाठी सरपंच उपसरपंच उडवा उडवी चे उत्तरे देत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला