आरोग्य खात्याच्या पिवळी उपकेंद्रातील पथक वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात.
शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अघई अंतर्गत येणाऱ्या पिवळी उपकेंद्राच्या पथक वैद्यकीय अधिकारी रेखा सावंत सोनावणे वय ४४ वर्ष यांना बुधवारी दुपारी २ च्या सुमारास ११००० रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. एका ५० वर्षीय महिलेकडून शासनाकडून किशोर वयीन मुलांकरिता आलेल्या निधीमधून बेकायदेशीररीत्या स्वतःचा हिस्सा तक्रारदार यांच्याकडे वारंवार मागणी करत असतांना तक्रारदार महिलेने मात्र हे बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने त्यांचा वार्षिक गोपनीय अहवाल खराब करेन असे धमकावून ११ हजारांची लाच घेतांना सापळा पथकातील पोलीस निरीक्षक स्वप्नील जुईकर, पोलीस हवालदार योगेश परदेशी, हवालदार मोरे, पवार, गायकवाड, शेख, पोलीस नाईक सांबरे यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई लाचलुचपत पथकाचे ठाणे परिक्षेत्र अधीक्षक सुनिल लोखंडे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल धेरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात अली. पुढील अधिक तपास ठाणे लाचलुचपत खात्याचे अधिकारी करीत आहेत.