नगरपरिषद शाळांमधील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा त्वरित भरा. :- मागणी
जळगाव जा. :- नगरपरिषद जळगाव जामोद क्षेत्रातील शाळांमध्ये मागील ४-५ वर्षांपासुन वर्ग जास्त परंतु शिक्षक मात्र कमी असल्यामुळे शिक्षकांवर जास्त ताण वाढत आहे.शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना शिकवत असताना पाहिजे तो वेळ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व शिक्षकांना सुद्धा जास्त ताण पोचणार नाही
याकरता वेळोवेळी जळगाव जामोद वासियांकडून मागणी होत असतांना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.तरी शासनाने या विषयाला गांभीर्यपूर्वक घेऊन शिक्षक उपलब्ध करून दिले पाहिजे याकरता आज दिनांक ६ जुलैला मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी अशपाक, देशमुख ,अजय गिरी, आनंद सपकाळ उपस्थित होते.