Breaking News
recent

पूरपीडितांना त्यांना तात्काळ मदत करा

 



सोनाळा येथे काल रात्री अकरा वाजता पासून सततधार पाऊस सुरु होता. व आज सकाळी पहाटे ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात झाली व गावातील लेंडी नाल्याला भीषण महापूर आला, या पुराने कित्येक संसार उध्वस्त झाले.किनाऱ्यालगतचे कित्येक घरे पुरात वाहून गेले गोरगरिबांच्या घरातील दैनंदिन वापराच्या घरगुती वस्तू खाण्यापिण्याच्या सामानासहित वाहून गेल्या. कित्येकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, पुराची भीषणता भयावह होती.ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच उपसरपंच यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पूरपीडितांना जिल्हा परीषद शाळेमध्ये आश्रय मिळउन दिला ज्या लोकांची घरे पुरात वाहून गेली अश्या पन्नास ते साठ लोकांना जेवणाची व्यवस्था करुन देण्यात आली. 


प्रसंगावधान बाळगून तलाठी जाधव, रियाज शेख मंडळ अधिकारी चामलाटे उपस्थीत झाले. थोड्या वेळातच तहसीलदार साहेब श्री योगेश टोंपे साहेब व एसडीओ साहेब सुध्दा जीप शाळेत हजर झाले. त्या नंतर तहसीलदार साहेब यांनी पूरपीडितांची विचारपुस करुन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्तांना अल्पशी तात्काळ मदत म्हणून राशन दुकानदारांना राशन पुरवण्यासाठी आवाहन केले संपूर्ण दिवसभर ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य व सरपंचांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली व सर्व बाधित नागरिकांची संध्याकाळची जेवणाची व्यवस्था केली. वैद्यकीय टीम ने सर्वांची वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार केले. या कामी मदत करणाऱ्या सर्वांचे ग्रामपंचायत सोनाळा तर्फे मनपूर्वक आभार.

Powered by Blogger.