Breaking News
recent

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी आ. संजय कुटे

 


जळगाव जामोद मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक आलेल्या पुरात अनेक गावे बाधित झाली असून पुरामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मी स्वतः त्याठिकाणी भेट दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार शेकडो गुरे, शेकडो घरे पाण्याखाली गेल्याने ही सर्व कुटुंब उघड्यावर आली आहे. गेल्या १०० वर्षातही इतक्या मोठ्या प्रमाणात अश्या प्रकारची पूरसदृश परिस्थिती जळगाव जामोद मतदारसंघात आलेली नव्हती.

आज सकाळपासून आमदार संजय कुटे बाधित गावांपर्यंत पोहोचून प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधत आहे. न भरून निघणारे नुकसान झाले असून कुणाची घरे, कुणाचे धान्य, कुणाचा कापूस तर कुणाची दुचाकी वाहने वाहून गेली. कमी वेळात प्रचंड पाऊस, ढगफुटी या सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अवघी जमीन वाहून गेली. पिकांचं तर अतोनात नुकसान झालं.

जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, निकषांच्या जाचात न अडकता २०१९ व २०२१ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पूरग्रस्तांना तात्काळ अन्नधान्य, रोख स्वरूपात मदत देण्यात आली तसेच वाढीव दरांनुसार नुकसानीची भरपाई देण्यात आली त्याचप्रमाणे जळगाव जामोद मतदारसंघासाठी देखील मदत जाहीर करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार संजय कुठे यांनी केली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत या गंभीर परिस्थितीची माहिती त्यांना दिली. त्यांनी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. राहिलेल्या इतर गावांमध्ये देखील भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी आम्ही करणार आहोत.


पूरग्रस्तांना अन्न व पाणी पुरविण्यासाठी आज सकाळपासून यंत्रणा कार्यरत झाली असून नगर परिषद प्रशासन, जिल्हा प्रशासन इतर राजकीय - सामाजिक संघटना देखील आपापल्या पातळीवर मदतकार्य करत आहेत. ही वेळ रडण्याची नसून लढण्याची आहे. ही वेळ राजकारणाची नसून पूरग्रस्तांना सावरण्याची आहे. आपण सर्व मिळून या संकटाचा सामना करूया..!! आ . संजय  भाऊ कुटे

Powered by Blogger.