मुख्यमंत्री तेलंगना के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत वाटेगाव येथे अभिवादन सभा व पुरस्कार वितरण सोहळा
श्रीगोंदा. प्रतिनिधी
१ आगस्ट २०२३ रोजी साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे या वर्षी त्यान्च्या जन्मभूमीत लाखोच्या संख्या मद्दे उपस्थित राहून अण्णा भाऊ साठे जयंती व अभिवादन सभा व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. तरी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी एकत्रित यावे. असे आहवान मानव हित लोकशाही पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे.(अण्णा भाऊ यांचे नातू व मानवहीतलोकशाही पक्ष राष्ट्रीय सचिव गणेश भगत,(अण्णा भाऊ साठे यांच्या बहिणीचे नातू,)(रंजना बलसाने ( महिला प्रदेश अध्यक्ष )यांनी केले आहे.
जय लहुजी बोलो..चलो वाटेगाव..महाराष्ट्रातील लहुसैनिकांनो १ आॅगस्ट २०२३ रोजी आपणं सर्वांनी सांगली जिल्हा वाटेगाव येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन साहित्यरत्न, विश्वरत्न, लोकशाहिरडॉ.अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी वाटेगाव सांगली येथे जमावे.
आपणं तर दरवर्षी आप-आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात व गावात जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करतो पण यावर्षी आपल्याला आपली उर्जाभुमी व साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव याठिकाणी लाखों समाज बांधवांच्या साक्षीने आपल्याला जयंती साजरी करून अभिवादन करण्यासाठी यायचं आहे, यावर्षी वाटेगाव येथे लहुसैनिक लाखोंच्या संख्येने आलोट गर्दी करुन अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, अण्णा भाऊ साठे यांची जन्मभूमी संबंध भारत देशाला दाखवुन द्यायची आहे. तसेच लहुजी ची ताकत ही एकजुटीने दिसली पाहिजे. या कार्यक्रमा साठी मुख्यमंत्री तेलगणां राज्य के. चंद्रशेखरराव, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम अध्यक्ष म्हणून सावित्रीमाई साठे असणार आहेत. प्रमुख उपस्थित शंकरअण्णा धोडगे, भगिरत भालके.आर. बी. साठे साहेब (महा. प्रदेश अध्यक्ष ),रंजना ताई बलसाने,(महिला प्रदेश अध्यक्ष ) वेंकट सोनटक्के. इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त समाज बांधवानी उपस्थित राहावे असे अहवान संयोजक मानवहित यांनी लोकशाही पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे व मानव हित लोकशाही पक्ष राष्टीय सचिव गणेशजी भगत, यांनी केले आहे. त्या ठिकाणी १० ते १२ या वेळेत राधा खुडे यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती प्रसिद्दी पत्रकात दिली आहे.