अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा आढावा
जळगाव जामोद शहरासह संपूर्ण जळगाव जामोद मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा आढावा घेतला, यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. काळे साहेब, पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद न.प. मुख्याधिकारी, व संबधित इतर सर्व यांच्या अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील आलेल्या महापुरामुळे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे, प्रारंभी शहर व गावांतील रहिवाशी भागातील सर्वे करण्याचे निर्देश दिले असून पूर्णतः नुकसान झालेल्या नागरिकांना रोख शासकीय मदत व मोफत राशन देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. उद्या पर्यंत पुराने बाधित झालेल्या सर्व नागरिकांना रोख मदत व राशन प्राप्त होणार आहे.
पुरग्रस्तांना आधार देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळावी, अशी सर्व विदारक परिस्थितीत तालुकास्तरावरील यंत्रणा काम करत असताना जिल्हा स्तरावररून काही उपाययोजना होत आहेत की नाही याबाबत आढावा घेतला असून, जिल्हा प्रशासन आजपासूनच सर्वे करण्यास सुरुवात करणार असून शेतीचे सर्वे हे येत्या दोन दिवसात सुरु होणार आहेत.
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व महसुली मंडले हे अतिवृष्टीने बाधित म्हणून घोषित करण्याच्या सूचना केल्या असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. रस्त्यांच्या नुकसानीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे याकरीता रस्त्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे, पुरामुळे नदी, नाल्यातील मोऱ्यांना अडकलेला कचरा जेसीबीच्या सहायाने सार्वजनिक बांधकाम विभागाने व नगर परिषद प्रशासन त्वरीत काढून घेण्यासाठी जळगाव जामोद शहरात प्रशसकीय यंत्रणा कार्यरत झाली असून लवकरच जळगाव शहर पूर्वरत होणार आहे, सोबतच उर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार असून खंडित झालेला वीजपुरवठा लवकरच पूर्वपदावर आनण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे.
सर्व विभागांनी समन्वय साधत संवेदनशीलपणे अतिवृष्टी झालेल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तसेच पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या झाल्या होत्या त्या आता व्यवस्थित सुरु केल्या असून पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. अनेकांच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी गेल्याने ते पाणी पिण्यासाठी उपयुक्त नसल्याने त्यांना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली असून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
अतिधोकादायक असलेल्या वस्त्यांमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले असून त्यांची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
अश्या परिस्थितीत अनेकांना किरकोळ आजारांची लागण होत असते, मलाही डोळ्यांचा त्रास होतोय, आपणही सर्वांनी आपली काळजी घेत स्वतःचे स्वास्थ्य जपावे.
झालेली परिस्थिती अत्यंत भयावह असून झालेले नुकसान कधीच भरून न निघणारे आहे , यांसदर्भात उद्याच्या विधिमंडळ अधिवेशनात हि संपूर्ण परिस्थीति कथन करणार असून राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे हि कळकळीची विनंती.