शेतकऱ्यांनी वातावरणाचे अंदाज घेऊन दक्ष रहावे आ.संजय कुटे
सकाळपासून सतत धार पावसामुळे लाडनापुर येथील पांडव नदीवरील जळगाव अकोट रोड वरील पुलाची किनार पाण्यामुळे वाहून गेली व नदीकाठच्या घरांच्या नुकसान झाले तसेच शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले ही माहिती मिळताच जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय जी कुटे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे फुंडकर साहेब घटनास्थळी येऊन पुलाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे सांगितले तसेच सर्व शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन आपापल्या सुरक्षितेबद्दल प्रत्येकाने काळजी घ्यावी प्रशासन आपल्या पाठीशीच आहे परंतु कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष रहावे असे आवाहन केले