Breaking News
recent

अवैध्यरीत्या खैराची लाकडे घेऊन जाणारा पिकअप टेम्पो जप्त



    शहापूर तालुक्यातील दहिवली परिमंडळ हद्दीतील नियत क्षेत्र बावघर मधील राखीव वन कंपार्टमेंट नंबर ८४९ लगत सर्वे नंबर ६३ व ५८ मध्ये शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास सफेद रंगाची काळी ताडपत्री बांधलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप संशयास्पद रित्या आढळून आल्याने याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच या ठिकाणी धाव घेऊन वनविभागाने पाहणी केली असता गाडीच्या बाजूला खैराच्या लाकडाचे १ मीटर ते ३ मीटर लांबीचे एकूण ४१ नग या ठिकाणी मिळून आले आहेत. त्याची अंदाजे किंमत ५०,००० रुपयांहून अधिक आहे.  सदर गाडीचे नंबर प्लेट खैर तस्तकारांनी सगळीकडे खोडून टाकल्याने फक्त शेवटचा २३ हा अंक दिसून येत आहे. 

    यावरून सदर गाडीचा उपयोग चोरीसाठीच करण्यात येत असेल असे निष्पन्न होत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचा पिकअप आणि जप्त केलेला मुद्देमाल शहापूर काष्ट विक्री आगार येथे ठेवण्यात आला असून याबाबत भारतीय वनाधिनियम १९७२ चे कलम २६ (ड ) (फ ) ४१(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दहिवली परिमंडळाचे वनपाल दत्तात्रय शिंदे वनरक्षक चंद्रप्रकाश मौर्य, संदीप जाधव, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज तिवरे, वनमजूर दशरथ निचीते, बुधा शीद आणि विठ्ठल सावंत यांनी ठोक कामगिरी बजावत सदरचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Powered by Blogger.