वाशीम जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर शिवसेना उबाठा च्या वतीने धरणे आंदोलन.
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
वाशीम येथे जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने धरणे आंदोलन.वाशीम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले परंतु अद्याप पर्यंत कुठलीही तात्काळ मदत मिळाली नाही तसेच जमिनी खरडून गेल्या,पिके वाहून गेली,विहिरी खचल्या बुजल्या या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शेतीला हेक्टरी ५० हजार व विहिरीला 2 लाखापर्यंत मदत करावी व जमिनीचे बांध फुटून झालेल्या नुकसानासाठी जेसीबी द्वारे बांध काढुन देण्यात यावे.व इतर मांगण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे सेना गटाचे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे नेते अनील गजाधरजी राठोड, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधीर कवर,मानोरा तालुका प्रमुख रविंद्र भाऊ पवार,तथा वाशिम जिल्हाध्यक्ष,तथा नेते मंडळी उपस्थित होते