Breaking News
recent

गंगाखेड येथील युवकांचा आदर्श समाज बांधवानी घ्यावे :-- शेखर महाराज (पोहरदेवी)



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

मानोरा :-- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व परिसरातील चाळीस युवक एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षण व अंधश्रद्धेवर काम करीत आहे. या युवकांचा आदर्श समाज बांधवानी घ्यावा असे भावोदगार देविभक्त शेखर महाराज यांनी पोहरादेवी येथे दर्शन करिता आले असता अंबादास राठोड यांचा सत्कार करतांना ते म्हणाले.

   गंगाखेड तालुक्यातील बंजारा समाजाचे जेष्ठ नेते बाबुराव पवार ढवळकेवाडीचे सरपंच  अशोक राठोड, गोदावरी तांड्याचे मोहन राठोड,  शिवाजीनगर येथील  ओमकार बिझनेस ग्रूपचे  अंबादास राठोड, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा डी एस जाधव, सेवानिवृत्त ASI  दिगंबर राठोड,  नामदेव राठोड,  दत्तराव चव्हाण, भगवान चव्हाण, माऊली राठोड, शेषनाग राठोड,  नारायण राठोड, अंकुश चव्हाण,  प्रल्हाद राठोड, आदी समाजातील सामाजिक पदाधिकारी व प्रा बी एस पवार, प्रा बळीराम चव्हाण, लिंबाजी चव्हाण,  नागोराव चव्हाण , लेझीम व हलगी मास्टर  राजकुमार राठोड  व बंजारा कर्मचारी बांधवांची पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी आले असता लेझीम पथकाणे आपली कला सादर केली याप्रसंगी देविभक्त शेखर महाराज यांच्या हस्ते गंगाखेड तालुक्यातील बंजारा समाजाचे  बाबुराव पवार, ढवळकेवाडीचे सरपंच  अशोक राठोड, गोदावरी तांड्याचे  मोहन राठोड,  शिवाजीनगर येथील ओमकार बिझनेस ग्रूपचे मार्गदर्शक अंबादास राठोड, व लेझीम व हलगी मास्टर राजकुमार राठोड यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी पोहरादेवी सरपंच विनोद राठोड, संजय महाराज,प्रेम महाराज,धर्मराज महाराज, सह भाविकाची उपस्थिती होती.

Powered by Blogger.