नुकसानग्रस्त शेतीचे ८०% पंचनामे पूर्ण..
पुढील आठवड्यात सानुग्रह अनुदान वाटप १००% पूर्ण करणार. मागच्या वर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या मदतीचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा.मागील वर्षीच्या पीक विम्याची रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारबाधित नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या कायमआस्वरुपी उभारणी साठी भरीव मदत मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा सुरू.
दि.२२ जुलै २०२३ रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा व नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला जळगाव जा., शेगाव व संग्रामपूरचे तहसीलदार, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, जि.प.बांधकाम विभागचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह संबधित विभागांच्या अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून येत्या दोन-तीन दिवसात १०० टक्के पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. बाधित घरांचे वाढीव ५ हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान पुढील आठवड्यात १०० % बाधितांना वाटप करण्यात येणार आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीचां निधी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून त्याचे वाटप लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर मागील वर्षीच्या पीक विम्याची ४-५ कोटींची रक्कम मिळणे बाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असून ती लवकरच मिळणार आहे व त्यानंतर त्याचे सुद्धा वाटप शेतकऱ्यांना करण्यात येईल.
जळगांव जामोद मतदासंघांतील अतिृष्टीमुळे बाधित झालेल्या कोणत्याही नागरिकाने खचून जाण्याची गरज नाही, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून राज्यातील शासन हे नागरिकांचे हित जोपासणारे सरकार असल्यामुळे प्रत्येक बाधित नागरिकाला जीवनात कायमसवरूपी उभे राहण्यासाठी सरकार मार्फत भरीव मदत खेचून आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नरत राहणार आहे.