Breaking News
recent

रस्ता मंजूर; मात्र चार वर्षा नंतर ही काम अपूर्ण



मानोरा प्रतिनीधी (वाशिम):- बाबूसिंग राठोड

 मानोरा :-- तालुक्यातील फुलउमरी भुली मार्गे मानोरा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गिट्टी उखळून जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याने चिखल झाले आहे मोटारसायकल घसरून जीव गेल्यावर रस्ते बनवणार का? असा सवाल  उपस्थित केल्या जाऊ लागले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता आमदार राजेंद्र पाटणी यांनी सण २०१८ - १९ मध्ये  सदर रस्त्याच्या बांधकामासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ७  किमीकरिता ४ कोटी  रुपयाचा निधी मंजूर करवून घेतला होता, मात्र रस्त्यांच्या कामाला सुरुवात  झाली मात्र संमधीत कंत्राकदार कडून रस्तावर गिट्टी व पूल निर्मितीचे काम झाले मात्र रस्त्यावर मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम चार वर्ष झाले तरी पुढे सरकत नाही. फुलउमरी, सोमेश्वरनगर, उमरी खुर्द, उमरी बु, शेंदोना, गहूली परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यादाठी जवळचा म्हणजे अकरा किमी वर मानोरा तालुका येते त्यामुळे सदर रस्ता दर्जेदार करावा असा दम खुद लोकप्रतिनिधीनी दिला सदर कंत्राकदार यांनी एक वर्षात काम करण्याचे शासनाकडे करार नामा केला असतांना चार वर्ष पूर्ण झाली असतांना समंधित कंत्राकदार यांना काळ्या यादीत टाकून त्याचे कडून दंड वसूल का करीत नाही असा सवाल नागरिकांतून होत असून रस्त्याचे कामाला गती देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.आज घडली ला शेतकरी बांधवाना उघड्या गि्टीवरून प्रवास करावा लागत आहे.

 फुलउमरी ते भुली सात किमी रस्ता हा सण २०१८/१९ मध्ये मंजूर होऊन रीतसर भूमिपूजन होऊन कामाला सुरवात झाली कोरोना काळात दोन वर्ष काम होऊ शकले नाही. आज रोजी पूल निर्मिती, गिट्टीचे काम झाले असून भुली कडून फुलउमरी कडे अडीच किमी डांबरिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लौकरच उर्वरित रस्त्यावर बीबीएम व त्या नंतर डांबरिकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल-बी. सी. नगराळे शाखा अभियंता वाशीम

Powered by Blogger.