युवक काँग्रेस राबविणार युवा जोडो अभियान !
अमोल तरोडकर यांची माहिती : संघटन बांधणीवर भर
मानोरा प्रतिनीधी(वाशिम) :- बाबुसिंग राठोड
मानोरा : तालुक्यासह राज्यात वाढत असलेली बेरोजगारी, महागाई व युवकांच्या विविध प्रश्नांना घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात युवकांना जागृत करण्यासाठी युवक काँग्रेस आता पुढे येत आहे. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून युवक कॉंग्रेस मानोरा तालुक्यासह जिल्ह्यात 'युवा जोडो अभियान' राबविणार आहे, अशी माहीती युकाँचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल तरोडकर यांनी बुधवारी बोलतांना दिली .यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष बलदेव महाराज, तालुका अध्यक्ष ईफखार पटेल,माजी नगरपंचायत अध्यक्ष बरखा अल्ताफ बेग, रामनाथ राठोड, वसंत भगत,गजानन मीरासे आदी उपस्थित होते.
बेरोजगारीवर मात करण्यासाठी तरुणांना नवे उद्योग सुरू करण्याकरिता निम्न व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, कौशल्य विकासावर आधारित नवे उपक्रम राबविण्यात यावे. तालुकास्तरावर सुसज्ज अशा किमान २५० विद्यार्थी क्षमतेच्या २४ तास खुल्या अभ्यासिका तयार करण्यात याव्या, तालुकास्तरावर क्रीडांगण तयार आहे.मात्र ते शेवटची घटका मोजत आहे.ते सुसज्य असे बनविण्यात यावे.कृषी महाविद्यालयात स्थानिकांसाठी प्रवेशक्षमता वाढवून देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री यांना पाठविल्याचे तरोडकर यांनी यावेळी सांगितले.