स्व अरविंद उमाळकर वृद्धाश्रमास दिली 11 लाखाची देणगी
सामाजिक दायित्व अंतर्गत अंकुर सिड्स ने दिला मदतीचा हात
प्रतिनिधी मेहकर
जगदंबा बहुउद्देशीय संस्था मेहकर अंतर्गत स्व अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाच्या उभारणीसाठी सामाजिक दायित्व अंतर्गत अंकुर सिड्स नागपूर ने तब्बल ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
अंकुर सिड्स चे विशाल उमाळकर यांनी आज स्व अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे अध्यक्ष अजय उमाळकर आणि पदाधिकाऱ्याकडे आज धनादेश सुपूर्द केला.
यावेळी अध्यक्ष अजय उमाळकर, उपाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, राजू जैस्वाल बबनराव तुपे,प्रदीप शेळके, पुरुषोत्तम शर्मा,विजय उमाळकर आदी हजर होते
विषेश म्हणजे विशाल उमाळकर यांनी यापूर्वी सदर वृद्धाश्रमास सन्मानजनक वैयक्तिक मदत देखील केलेली आहे