महाराष्ट्रतील प्रत्येक विभागातून शेतकरी आमदार निवडणूक घेण्यात याव्या निवेदन द्वारा मागणी - सामाजिक कार्यकर्ता रमेश उत्तम पवार उर्फ सोनू पवार
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
मानोरा तालुक्यातील उमरी येथील सामाजिक कार्यकर्ता रमेश उत्तम पवार उर्फ सोनू पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहेत. या निवेदनात शेतकऱ्याची होणारी हेळसांड कुठे तरी बंद होण्या करीता. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक विभागातून शेतकरी आमदार राखीव करावा जसे विभागातून पदविधर निवडणूक घेण्यात येतात त्याच धर्तीवर प्रत्येक विभागातून शेतकरी आमदार निवडणूक घेण्यात याव्या या संदर्भात मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन एकमताने ठराव मंजूर करावे असे निवेदनात नमूद आहे शेतकऱ्यातून आमदार झाल्यास मालाचे भाव,दर,शेतकाऱ्याचे समस्याची जाणीव असल्यामुळे शेतकरीला न्याय् मिळेल अश्या आशयाचा निवेदन मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे या निवेदनावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.