भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे यांनी केला दत्ताभाऊ उमाळे यांचा सत्कार
प्रकाश गवई यांच्या घरी पार पडला कार्यक्रम, दिग्गज पत्रकारांची उपस्थिती
, मेहकर, ता.15:
लोकमतचे तालुका प्रतिनिधी दत्ता उमाळे यांची मेहकर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नारायण मान्टे यांच्या हस्ते ( ता.15)करण्यात आला.हा कार्यक्रम भाजप नेते प्रकाश गवई यांच्या घरी आयोजित करण्यात आला. यावेळी भाजपचे अर्जुनराव वानखेडे, डॉ. प्रशांत राठोड,सारंग माळेकर यांच्यासह पत्रकार नागेश कांगणे, जनस्वप्नपूर्तीचे संपादक तथा लेखक विनोद बोरे, दैनिक विदर्भ सत्यजितचे संपादक उद्धव फंगाळ, दैनिक अहिल्याराजचे पत्रकार शिवशंकर मगर, अनिल मंजुळकर, अय्याज शहा, सिद्धेश्वर पवार, सतीश मवाळ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
दत्ताभाऊ उमाळे हे पत्रकारितेत सर्वांना सोबत घेऊन चालणारे धडाडीचे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी भोसा या गावी पत्रकारितेची सुरुवात करून आजरोजी ते लोकमतसारख्या मोठ्या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आहेत. जनसामान्यांच्या अनेक समस्या त्यांनी शासन दरबारी आपल्या लेखणीद्वारे मांडल्या आहेत.