स्कूल ऑफ स्कॉलर्स खेळाडूंची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरिता निवड
मलकापूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. स्पर्धेत तब्बल जिल्ह्यातील ५१ खेळाडूंनी सहभाग घेतला. यात स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून विजय संपादन केला. १४ वर्षे मुले वयोगटात इयत्ता सहावी मधील योगेश जाट - प्रथम क्रमांक व युवराज चौधरी द्वितीय क्रमांक पटकाविला. १४ वर्षे मुली वयोगटात इयत्ता आठवी मधील कु. पलक परदेसी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १७ वर्षे मुली वयोगटात इयत्ता दहावी मधील कु. विनिता चौधरी- प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले. आणि १७ वर्षे मुले वयोगटात इयत्ता दहावी मधील तनिष्क तायडे - तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजयी खेळाडूंनी विभागस्तरीय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले. या विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक स्वप्निल साळुंके, ओम गायकवाड, अजय शिंगणे, मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या विजयी खेळाडूंचे शाळेचे संचालक अमरकुमार संचेती, प्राचार्य सुदीप्ता सरकार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी कौतुक व अभिनंदन केले.