धनगर समाज बांधव उपोषणावर ठाम; सोळाव्या दिवशीही उपोषण सुरूच
यशवंत सेनेची सरकार सोबत ची बैठक निष्पळ आज पासून राज्यभर धनगर समाज्याचे आंदोलन अजुन तीव्र होईल- बाळासाहेब दोडतले
जामखेड धनगर आरक्षणाबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली बैठक निष्फळ ठरली हे समजताच चोंडी (ता. जामखेड) येथे आंदोलनस्थळी उपोषणकर्ते यशवंत सेनेचे उपाध्यक्ष सुरेश बंडगर यांनी त्यांना डॉक्टरांनी लावलेला ऑक्सिजन मास्क काढून टाकला. तसेच पुढील उपचार घेण्यास नकार दिला.धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी चोंडी येथे यशवंत सेनेने सुरू केलेल्या उपोषणाचा गुरुवारी १६ वा दिवस होता. धनगर आरक्षण प्रश्नी राज्य, केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आहेत. आंदोलकांची मागणी आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके आदी उपोषणाला बसले यातील माणिकराव दांगडे यांच्यावर उपोषणस्थळी उपचार केले जात आहेत. यशवंत सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब रूपनवर यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरूआहेत.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणकर्त्यांनी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, तो सरकारने न पाळल्यामुळे धनगर समाजाच्या वतीने खंबाटकी घाट व राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले होते. यानंतर सरकारने मुंबई येथे गुरुवारी दुपारी बैठक घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले मुंबईला बैठकीसाठी रवाना झाले होते. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास सुरेश बंडगर यांची तब्येत खालावली.
त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन मास्क लावला. तो मास्क दीड तास होता. मुंबईतील बैठक निष्फळ ठरल्याचे समजताच बंडगर यांनी ऑक्सिजन मास्क काढून टाकला अन् पुढील उपचार घेण्यास नकार दिला. उपोषण सुरूच ठेवण्याचा | निर्णयही त्यांच्यासह इतर आंदोलकांनी घेतला.
आम्हाला फक्त आरक्षण हवे
मुंबई येथे शासनाने बोलविलेल्या बैठकीसाठी गेलो होतो. परंतु, धनगर आरक्षणाबाबत न्यायालयात सुरु असलेल्यायामध्ये राज्य सरकारने वेळकाढूपणाचे धोरण घेतले आहे. सुनावणीसाठी मदत करू, समाजाच्या कल्याणासाठी १६ योजना सुरु केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करू, असे सांगत राज्य सरकारच्या वतीने उपोषण मागे घेण्यास सांगण्यात आले. मात्र आमची मागणी एकच आहे. आम्हाला कोणत्याच योजना नको, मंत्रीपद, आमदार, खासदार नको. आम्हाला फक्त धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचे उपोषण चालूच राहील, अशी भूमिका आम्ही मांडली. पडळकर हे भाजपची भूमिका मांडत आहेत. आम्ही १६ दिवसांपासून उपोषणाला बसले ते त्यावेळी कोठे होते, असा सवाल उपोषणकर्ते, यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केला.