Breaking News
recent

मी पाहिलेला मी अनुभवलेला खरा समाजसेवक आजच्या काळातील खरा अवलिया दुर्गादास राठोड उर्फ डी डी नाईक


(वाशिम) मानोरा.ता.प्र :- समाजात समाजसेवा करणारी बरीच मंडळी आहेत, काहीजण समाजसेवेतून स्वार्थ साधतात तर काही परमार्थ साधतात, काहीजण इतरांच्या भल्यासाठी तर काहीजण दिखाव्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी समाजसेवा करीत असतात सामाजिक राजकीय समाजसेवेची बरीच उदाहरणे देता येईल पण मनात उदात्त हेतू ठेवून समाजकार्य करणाऱ्यापैकी एक म्हणजे डीडी नाईक.लोकलच्या वेगासोबत अविरत धावणाऱ्या मुंबई मायानगरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवा देत डीडी नाईक हे आपल्यापरीने तन-मन-धनाने समाजसेवा करीत आहे, मागील एक दशकापासून मी त्याची समाजाबद्दलची आस्था तळमळ बघत आलोय, समाजासाठी व समाजातील कोणत्याही प्रश्नासाठी ते नेहमी हजर असतात मग प्रश्न कुठलाही असो' एखाद्या नेत्याने समाजाला हाक दिली सामाजिक प्रश्न सदनात उचलला तर तो बघणार नाही हा नेता अमुक अमुक पक्षाचा आहे डीडी नाईक तिथे तत्पर असतो, एखाद्या संघटनेने मोर्चा काढला तर तो बघणार नाही ही संघटना कोणती आहे त्या संघटनेने समाजासाठी आतापर्यंत काय केले हे बघणार की आत्ता समाजासाठी उतरतोय तर मीही साथ देणार अशी भावना कायम डीडी नाईकची दिसते, मी सुद्धा स्वतःला समाजसेवक समजतो पण डीडी नाईकाची सर कधीच येणार नाही.

     कालपरवा लोकलच्या धडकेने बिगारी काम करणाऱ्या आपल्या समाजातील एका मुलाचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त कळताच डीडी नाही तिथे हजर झाले! नुसते हजरच झाले नाही तर त्यांच्या नातेवाईकाची परिस्थिती बघता त्यांनी स्वतः शारीरिक आर्थिक मदत तर केलीच" शिवाय समाज बांधवांनाही आर्थिक मदतीसाडी आव्हान केले आणि जवळपास 30-35 हजाराची आर्थिक मदत मिळवून दिली, दोन-चार दिवसांपूर्वी ते जिथे वास्तव्यास आहे तिथे तीज तोडणीचा कार्यक्रम चालू असताना गावाकडील कोणीतरी समाज बांधव जेजे रुग्णालयात मृत्यू पावले अशी बातमी कळताच ते कार्यक्रम सोडून रुग्णालयात हजर झाले, यापूर्वीही समाजातील एका नाका कामगाराचे बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरुन पडून अपघाती निधन झाले त्यावेळेस काही समाज बांधवांच्या मदतीने त्यांनी बिल्डर कडून मूर्तकाच्या नातेवाईकास तब्बल 11 लाखाची मदत मिळवून दिली ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. इतकेच नव्हे तर समाज माध्यमातून सोशल माध्यमाद्वारे सामजिक संदेश देत राहतात, कवी लेखकांचे सामाजिक लेख काव्य समाज प्रबोधनाच्या दृषटिकोनातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवत असतात हे सुध्दा एक समाज सेवेचाच भाग आहे असे मी समजतो म्हणून अशा नितळ भावनेतून समाजसेवा करणाऱ्या अवलिया विषयी मनातून कौतुकाचे दोन शब्द लिहावे अशी इच्छा झाली, खालील चार ओळी खास डी डी नाईक साठी

Powered by Blogger.