Breaking News
recent

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील, शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून देणार- आ.डॉ.संजय कुटे



दिनांक २२ जुलै च्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या शेतीचे, खचलेल्या विहिरींचे, वाहून गेलेल्या साहित्यांचे व पिकांचे सविस्तर पंचनामे तहसील स्तरावरून पूर्ण करून घेतले असून त्याबाबत मंत्रालयामध्ये अपर मुख्य सचिव अनुपकुमार व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठी यांचे सोबत गेल्या तीन दिवसात पूर्ण पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी येत्या सात दिवसात त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यासंदर्भात प्रयत्न केला असून, तसा शासन निर्णय सात दिवसात निश्चित काढण्याबाबत सचिवानी आश्वस्त केले आहे, शासन निर्णय निघाल्यानंतर त्या नुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणेसाठी प्रयत्नरत असणार आहे.

तसेच जळगाव जामोद व नांदुरा तालुक्याच्या प्रस्तावातील त्रुटींचे निराकरण करून घेण्यास मान्यता मिळालेली असून त्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरु असून त्यांना सुद्धा लवकरच मदत मिळणार आहे. येत्या १५ दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या शेतीचे, खचलेल्या विहिरींचे, वाहून गेलेल्या साहित्यांचे व पिकांचे नुकसानीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणेबाबत निर्णय घेण्यात येईल त्याबरोबरच दोन्ही तालुक्यातील नदी खोलीकरण, त्यावर आवश्यक संरक्षण भिंत याबाबतचा जलसंपदा विभागामार्फत 500 कोटींचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून त्याबाबतही जलसंपदा मंत्री व विभाग यांचे समवेत बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

प्रचलित निकषांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहेत. सततच्या पावसामुळे पात्र १२२३५ शेतकऱ्यांपैकी १०६६३ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ७ कोटी ८३ लक्ष इतका निधी आतापर्यंत जमा करण्यात आला असून ११३७ शेतकऱ्यांचे ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) प्रलंबित होते त्यापैकी ५२५ शेतकर्यांनी ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) केल्याने येत्या ७ दिवसात त्यांच्या खात्यामध्ये २१ लक्ष रुपये इतका निधी जमा होणार आहे, उर्वरित शेतकऱ्यांनी  तत्काळ ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) केल्यास त्यांच्या खात्यात सुद्धा लवकरच मदत जमा करण्यात येईल.ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) बाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी महाईसेवा केंद्र मध्ये जाऊन तात्काळ ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) करून घेण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने  केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयामार्फत मनुष्यबळ देऊन हि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांच्या आत जमा होईल.

यामध्ये ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्यांनी सहभागी होऊन  शेतकरी बांधवांचे प्रमाणिकरण करून घेण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा आहे तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा आधार लिंक असलेले खाते क्रमांक ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्यासाठी द्यावा.त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या पीकविम्याबाबत मंत्रालयामध्ये सातत्याने पाठपुरावा सुरु होता,  परंतु प्रस्तावातील त्रूटीमुळे शेतकऱ्यांना मिळण्यास अडचण येत होती, काही शेतकऱ्यांनी त्रुटीची पूर्तता केल्याने त्यातील सुमारे ३ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात होईल.केवायसी न केल्याने  दुरुस्ती अभावी प्रलंबित असलेले पिकविम्याचे साडेचार कोटी  येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीतील प्रलंबित पीकविमा, सततच्या अतिवृष्टीची मदत व दि.२२ जुलैच्या अतिवृष्टीची मदत हे सर्व संवेदनशील प्रश्न मार्गी लागल्याने समाधान वाटत आहे.

Powered by Blogger.