Breaking News
recent

प्रा.पा मा निवने सरांच्या जीवनावर आधारित परिस्पर्श या स्मृतीग्रंथाचे व श्री संत जंगली महाराज गाथेचे प्रकाशन

 


सर्व माजी विद्यार्थी स्मृतिग्रंथातून उलगडनार निवणे सरांचा जीवनपट..


 नांदुरा ,प्रतिनिधी प्रशांत पाटील

डॉक्टर ,वकील ,इंजिनिअर ,साहित्यिक, शिक्षक, चित्रकार ,व्यंगचित्रकार ,असे वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारी माणसे ज्यांनी घडविले व त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे जीवन सार्थकी बनविले अशा सर्व माजी विद्यार्थ्यांनी पा.मा.निवने सरांच्या जीवनावर सरांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रत्येक गुणविशेष पैलूंचा अभ्यास करून स्मृतिगंध हा ग्रंथ तयार केला आहे .त्या स्मृती ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उद्या दिनांक 24/12 /2023 रोजी नांदुरा येथील श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल येथे आयोजित केला आहे .सोबतच नांदुऱ्याचे आराध्य ग्रामदैवत संत श्री जंगली महाराजांच्या पोथी गाथेचे सुद्धा प्रकाशन होत आहे .या प्रकाशन सोहळ्याला सरांचे सर्व क्षेत्रातील माजी विद्यार्थी उपस्थित राहणार असून नांदुरा मलकापूर विधानसभेचे आमदर मा  राजेशजी एकडे हे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत.तसेच या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन माननीय श्री गजानन नारे सरांच्या  हस्ते होनार असून या प्रकाशन सोहळ्यास मा प्राचार्य राजेश राजेंद्र कसर सरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


Powered by Blogger.