Breaking News
recent

ओएनजीसी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे आरोग्य शिबीर व मोफत चष्म्यांचे वाटप संपन्न

     


 (सुनिल केदारे ठाणे  प्रतिनिधी) 

ओएनजीसी लिमिटेड मुंबई ऑल इंडिया एस सी, एस टी एम्प्लाॅइज वेल्फेअर असोसिएशन मुंबई शाखा यांच्यावतीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे दि.५ व ६ डिसेंबर २०२३ रोजी बहुउद्देशीय चिकित्सा शिबिर व नेत्र तपासणी तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या दोन दिवसांमध्ये हजारे लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार चष्मांचे वाटत करण्यात आले. मागील ३५ वर्षापासून हा उपक्रम सातत्याने या दिवशी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे करण्यात येतो आहे.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशन अध्यक्ष पराग रामटक्के, सचिव रतन भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सदस्य विशेष परिश्रम घेतात.

Powered by Blogger.