Breaking News
recent

वधू-वर मेळावा ही काळाची गरज आहे--फादर रणनवरे


 शिर्डी (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )

बाभलेश्वर-- विखुरलेल्या ख्रिस्ती समाजामध्ये गरजेनुसार वधू-वर मेळावे घेणे ही  काळाची गरज असून सातत्याने आशा मेळाव्याचे आयोजन करण्यात संयोजकांनी आता क्रांतिकारी पाऊल उचलले आहे असे प्रतिपादन बाभलेश्वर येथील बाळ येशू चर्चचे  प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर अब्राहम रणनवरे यांनी केले आहे. फादर पुढे म्हणाले की, विवाहनन्तर मुलीने सासू-सासरे यांना आदराने व सन्मानाने वागऊन कुटुंबात प्रेम आणि ऐक्य टिकवून ठेवणे अत्यन्त आवश्यक आहे.  बाभलेश्वर येथील बाळ येशू चर्च व संगमनेरचे स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा डिसेंबर रोजी बाळ येशू चर्च मध्ये आयोजित केलेल्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी फादर बोलत होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य भाऊसाहेब साळवे म्हणाले की, मुलीच्या लग्ना नन्तर सासरी तीला पोटच्या मुलीप्रमाणे सन्मानाने वागवले पाहिजे. डॉ. शैलजा साबळे म्हणाल्या की, मुलींना माहेरी योग्य वयात संस्कार दिल्याने   त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होत आहे. प्रा. तिलोत्तमा  शेळके म्हणाल्या की, वर पक्षाने शैक्षणिक बाबतीत मुलींच्या शिक्षणाची कदर करावी. प्रा. विनोद पवार यांनी उपस्थितांना एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे विशद करून सांगितले. यावेळी ऍड. रवींद्र शेळके यांनी उपस्थितांना विवाह संबंधी शासकीय नोंदणी पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी बाळ येशू चर्च मधील रेव्ह. फादर संजय पंडित, सिस्टर अनिता ग्रेसिअस,  चर्चचे सक्रिय सभासद सुधाकर बनसोडे, मधुकर ब्राम्हणे, बोधक गुरुजी, रमेश क्षीरसागर, बाळासाहेब ब्राम्हणे, आनन्द सोनवणे सर, फिलिप कदम प्रामुख्याने उपस्थित होते. 

औरंगाबाद, कल्याण, नगर, श्रीरामपूर, बाभलेश्वर इत्यादी ठिकाणांहून आलेल्या २१५ हुन अधिक विवाहेच्छुक व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. सम्पूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले तर राजेश्वर पारखे यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र भोसले, विजय कदम, भरत गायकवाड, सुभाष कदम, प्रकाश भोसले यांनी परिश्रम घेतले.

Powered by Blogger.