चिमुकल्यांसाठी धावून आला "जिव्हाळा मित्र परिवार "
रिधोरा ता. मोताळा येथील सुनील मानकर यांचे कुटुंब मोल मजुरी करून आपल्या दोन मुली व एक मुलगा यांना शिकवून उदर निर्वाह चालवीत. मागील वर्षी सुनील यांचे पत्नीचे आजारपणामुळे शिर्डी येथे निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी सुनील यांच्यावर आली. त्यांनी मजुरी करून मुलांचा सांभाळ केला. त्यांना आईची आठवण होऊ नाही दिली. पण नियतीला हे मंजूर नसावे. सुनील मानकर यांचे आजारपणातच 30/11/23 ला निधन झाले. अन तीन भावंडे पोरकी झालीत. कुणाचाही आधार नाही. अशावेळी जेष्ठ साहित्यिक तुळशीराम मापारी हे देवदूत बनून आले. या मुलांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला अनेक हात पुढे झाले.
ही वार्ता जिव्हाळा ग्रुपला माहिती झाली. धनंजय मोरखडे यांनी मित्र परिवाराला हाक दिली व दोनच दिवसात 22,570 रुपये गोळा झाले. ही मदत घेऊन जिव्हाळा परिवार रिधोरा या गावात जाऊन ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक यांचे समक्ष चिमुकल्यांचे सांत्वन करत मदत दिली. त्यांचे पाठीवरून मायेचा हात फिरवला व भविष्यात अडचण आली तर हाक द्या. असा विश्वास दिला. यावेळी जिव्हाळा परिवारचे तुळशीराम मापारी, कैलास कडाळे, योगेश कोल्हे, भरत कोल्हे, भैय्या पाटील, कैलास मानकर, गोविंद राहाटे, मुन्ना महाले, परमेश्वर महल्ले, विठ्ठल डिवरे, भागवत उन्हाळे, शिवाजीराव मामनकर, संदीप गुळभेले, नीलकंठ दिवाने, अतुल तायडे, गजानन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांचे झंवर गुरुजी यांनी आभार व्यक्त केले. अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या जिव्हाळा परिवारचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.