तीकोडी येथे 15 नग देशी दारू टॅंगो पंच जप्त
दिनांक 16/01/2024 रोजी नांदुरा पोलीस स्टेशनचे अंमलदार पोना संजीव जाधव व आकाश भोलनकर हे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे माळेगाव-माहळुंगी बीट हदीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्तखबरे कडुन माहिती मिळाली की ग्राम तीकोडी येथे संतोष समाधान गावंडे वय 47 वर्ष रा.पोटळी हा अवैधरित्या देशी दारू जवळ बाळगुन त्याची विक्री करत आहे वरून सदर इसमावर प्रोव्ही. रेड करून त्याच्या कब्जातून 15 नग देशी दारू टॅंगो पंच किमती 450 रुपये व एक वायर ची थैली किमती 10 रुपये असा एकूण 460 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे आकाश भोलनकर यांचे फिर्यादवरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक 45/2024 कलम 65 (ई) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.