मनोरुग्न मुलाला दिले घरच्यांच्या ताब्यात
दिनांक 15/01/2024 रोजी सायंकाळी 18.00 वा. सुमारास एक मनोरुग्ण मुलगा नांदुरा शहरातील बसस्टॅन्ड परिसरामध्ये फिरत आहे व तो कुठून आला त्याचे नाव काय आहे, काही एक सांगत नसल्याने याबाबत सुज्ञ नागरिक दिनेश राऊत, विश्वकर्मा मुरेकर, सागर घुले सर्व रा.नांदुरा यांनी सदर माहिती पोलीस स्टेशन नांदुरा चे ठाणेदार श्री.विलास पाटील साहेब यांना दिली त्यानी तात्काळ पोलीस स्टाफ रवाना करून नमूद मुलास नागरिकासह पोलीस स्टेशनला आणून त्याला जेवण वगैरे देऊन त्याची आस्थेने विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव बळवंत उकंडी डोमे वय 26 वर्ष बनचिंचोली तालुका हादगाव जिल्हा नांदेड असल्याचे सांगितले व त्याचे कडून त्याचे मोठ्या भावाचा मोबाईल नंबर प्राप्त करुन घेवुन संपर्क साधला काही तासांमध्ये सदर मुलाचा मोठा भाऊ देवानंद उकंडी डोमे हे पोलीस स्टेशन नांदुरा येथे हजर आले असता त्यांनी कळविले की सदर मुलगा त्यांचा सख्खा लहान भाऊ असून तो डॉ. केळकर यांचे मनोरुग्ण रुग्णालयातून पळून नांदुऱ्याला आला आहे असे सांगितले वरून सदर मनोरुग्न मुलगा त्यांचे ताब्यात देण्यात आला आहे देवानंद डोमे यांनी नांदुरा शहरातील उपरोक्त सुज्ञ नागरिकांचे व पोलीस स्टेशन नांदुराचे ठाणेदार श्री विलास पाटील व पोलीस अंमलदार यांचे आभार व्यक्त केले आहे.