Breaking News
recent

श्री तिरूपती बालाजी संस्थान ने केला सिध्दहस्त कलाकार प्रियंका मुळतकर चा सन्मान !

नांदुरा : प्रतिनिधी

  शहरातील १०५ फुट ऊॅंच हनुमान मुर्ती व तिरूपती बालाजी संस्थान चे वतीने अकोला निवासी चित्रकार प्रियंका मुळतकर यांनी शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ जिजाऊ जयंती रोजी श्री हनुमान मुर्ती व तिरूपती बालाजी चे दर्शन घेतले होते.

    श्री हनुमान मुर्ती समोरील काम्प्लेक्स चे दुसर्‍या मजल्याचे टेरेसवर बसुन श्री हनुमान मुर्तीचे ड्राईंगपेपरवर आर्कषक असे कृष्णधवल चित्र साकारले होते.

    सदर छायाचित्र संस्थान ला प्रदान करण्याचे हेतुने कार्यालयात दाखविण्यात आले असतांना अध्यक्षांना सुचित करण्यात आले असता त्यांनी कलाकारीचा गौरव करण्याचे दृष्टीने तिरूपती बालाजी संस्थान चे वतीने मोहनराव नारायना नैत्र हाॅस्पीटल चे सभागृहात प्रियंका मुळतकर हिचा शाल,दुपट्टा, श्री हनुमानाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

    या प्रसंगी श्री तिरूपती बालाजी संस्थान, नांदुरा चे विश्वस्त नारायण ऊर्मी, नेत्र हाॅस्पीटल व्यवस्थापक डाॅ. विजय पाटील, पवन आगरकर, हाॅस्पीटल स्टाॅप व भाविक ऊपस्थीत होते.

Powered by Blogger.