Breaking News
recent

वरली मटका जुगार अड्ड्यावर धाड



 प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील

आज दिनांक 18/01/2024 रोजी पोलीस स्टेशन नांदुराचे ठाणेदार श्री विलास पाटील साहेब यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे डी.बी. पथकातील पोलीस नाईक राहुल ससाने, पोलीस कॉन्स्टेबल विनोद भोजने हे ग्राम निमगाव मध्ये प्रोव्हीशन व जुगार रेड कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त खबरे कडुन माहिती मिळाली की ग्रामपंचायत निमगावचे कॉम्प्लेक्स समोर सार्वजनिक ठिकाणी आरोपी नामे गणेश चंद्रभान महाले वय 34 वर्ष रा.रामपूर ता.नांदुरा हा वरली मटका आकड्याचा जुगार खेळताना व खेळवीताना मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत रेड केला असता त्याच्या कब्जातून 1330/- रुपये व एक बॉलपेन किमती पाच रुपये असा एकूण 1335/- रुपयाचा जुगार मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक 52/2024 कलम 12 मजुका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी सदर कारवाईबाबत आपले वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध देण्यास विनंती आहे 

Powered by Blogger.