जळगावात 25 लाखाचा सुगंधित गुटखा जप्त अन्न व औषध प्रशासन अमरावती विभागाची कारवाई
भगवंता चोरे प्रतिनिधी
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून बरामपुर रोडवरील रसलपुर फाटा नजीक बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच. 28 बी बी 6887 या वाहनांमधून चक्क 17 लाख 33 हजार 750 रुपयाचा गुटखा जप्त केला आहे.
सदर वाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणून जमा केले वाहनाची किंमत 8 लक्ष रूपये व अवैध गुटखा किंमत 17 लाख 33 हजार 750 रुपये जप्त करण्यात आला यामध्ये गुटखा वाहतूक करणारा आरोपी परमेश्वर निर्मळे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा याला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्यावर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अन्नसुरक्षा अधिसूचना उल्लंघन कलम 59 नुसार अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये तसेच सहकलम 272 273 188 व 328 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे देण्यात आला आहे.
सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार, सायक आयुक्त दक्षता आनंद महाजन, सह आयुक्त अमरावती विभाग जयपुरकर, साह्याक आयुक्त बुलढाणा केदारें, अन्नसुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी, गुलाबसिंग वसावे, रवींद्र सोळंके, वाहन चालक देशमुख बाप्पू तसेच जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार, पोलीस नाईका शेख इरफान, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल प हाड, पोलीस कॉन्स्टेबल रंजीत व्यवहारे यांनी संयुक्तरित्या पार पाडली..