श्रीराम प्रभु मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संबंधित नांदुरा पोलीस स्टेशन शांतता बैठक
आज दिनांक 20 /01/2024 रोजी 12.30 ते 13.15 वा. दरम्यान पोलिस स्टेशन नांदुरा येथे या. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. गवळी सा., आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा चे उपस्थितीत, 22 जानेवारी रोजी रामजन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम प्रभु मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संबंधानेपो.स्टे. हद्दीतील मस्जिद मौलवी, ट्रस्टी, प्रतिष्ठीत मुस्लिम नागरिक यांची मिटींग घेण्यात आली. मिटींग दरम्यान सदर उत्सव हा हद्दीत शांततेत संपन्न व्हावा यादृष्टीने उपस्थित यांना तरूण पिढीवर लक्ष ठेवून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम वगैरे सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोष्ट कोणीही टाकणार नाही, यादृष्टीने तरुण वर्ग यांना योग्य ते मार्गदर्शन करावे व लक्ष ठेवून राहावे, सर्वत्र टाळमृदंग सह दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून महाप्रसाद, भंडारे, भजन, रांगोळी , ध्वज / पताका, लाऊडस्पिकर व्दारे गाणी याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन राहणार आहे. तरी कोणत्याही परिस्थितीत कोठेही उत्सवाला गालबोट लागणार नाही या दृष्टीने तरुण पिढीवर लक्ष ठेवून राहावे, वरून मिटींग करीता उपस्थित मुस्लिम धर्मिय नागरिक यांनी आश्वासित केले. मिटींग करीता 20 ते 25 लोक उपस्थित राहिले.