उपवर-वधू राज्यस्तरीय परिचय मेळावा आ. संजय कूटे व रतन फुसेची उपस्थिती लाभणार
वरवट बकाल दरवर्षी प्रमाणे या वर्षि सुद्धा वरवट बकाल येथिल संत रूपलाल महाराज मंदिरात परिचय मेळावा समिती च्या वतिने २१ जानेवारी २०२४ रविवार रोजी राज्य स्तरीय बारी समाज उप वर वधु परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे यावर्षी हा ७ वा मेळावा असुन परिचय पुस्तिकेत नाव नोदणी निःशुल्क केली आहे
ग्रामीण भागात राज्यस्तरीय परिचय सम्मेलनाचे आयोजन करुन शेतकरी शेत मजूराच्या मूला मूली करिता सोयीचे ठरणार असल्याचे खामगांव चे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी रतन फूसे यानी १७ जानेवारी रोजी संत रूपलाल महाराज मंदिरात दर्शना साठी आले असता परिचय समिती शी बोलताना म्हणाले.
दरम्यान समाज बांधवाना याच संत रूपलाल महाराज मंदिरात पूढ़े कार्यक्रम करण्या चे सोयिचे ठरावे म्हणून एक डोम व बांधकामा साठी कोटी रुपयाचा निधि दिल्याची माहिती माजी सभापति पांडूरंग हागे यानी दिली ११ वा अयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री आ. संजय कुटे, संभाजीनगर जिल्याचे राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रवर्तक सदस्य रतनजी फूसे, वाशिम जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन चे अध्यक्ष .संजय पुंडलिकराव मिसाळ माजी बावनबीर जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाक्षीताई हागे, अजनगांव सुर्जी चे राजेश येऊल, अकोटचे माजी सभापती रमेश आकोटकार आदी सह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक संत रूपलाल महाराज मन्दिर समिती यानी केले आहे.