वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर प्रभावी कारवाई करण्यात येणार
प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील
पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतील मोटर वाहनाचे चोरीचे प्रकार रोखण्याकरिता व अपघातांची संख्या कमी होणे करिता तसेच बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावणे करिता आम्ही पो. नि विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा मी आमचे अधिनस्त असलेले वाहतूक शाखेचे अंमलदार यांचे सह नांदुरा शहरात विविध ठिकाणी पेट्रोलिंग दरम्यान 1) एकूण 72 वाहन चालकांवर कागदपत्रे व वाहन परवाना जवळ न बाळगणे 2) एकूण 19 वाहन चालकांवर कर्ण कर्कश हॉर्न वाजवणे 3) एकूण 09 बुलेट वाहनांवर ( कर्कश सायलेन्सर व फटाके फोडणाऱ्या ) 4) एकूण दहा अल्पवयीन वाहन चालकाने वाहन चालविणे 5) एकूण 36 वाहन नो पार्किंग मध्ये उभे करणे 6) एकूण 38 वाहन चालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे 7) एकूण 39 ट्रिपल सीट वाहन चालविणे 8) एकूण 38 फॅन्सी नंबर प्लेट लावणे 9) 39 विना नंबर प्लेट वाहन अशा एकूण 300 वाहनांवर कारवाई करून 30000/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
अशी वरील प्रमाणे मोटर वाहन कायदा अंतर्गत मागील दोन दिवसा मध्ये भरीव कामगिरी करण्यात आली आहे. तरी नांदुरा शहरातील व तालुक्यातील वाहन चालकांना आम्ही पोनी विलास पाटील ठाणेदार पोस्टे नांदुरा आवाहन करतो की आपले ताबे वाहन हे वाहतूक नियमांचे पूर्णपणे पालन करूनच चालवावे ताबे वाहन हे सुस्थितीत असल्याची खात्री करावी स्वतःची व इतरांची जीविताचे रक्षण करावे तसेच दारू पिऊन, विना नंबर वाहन तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याकरिता देऊ नये यापुढे पोलीस स्टेशन नांदुरा तर्फे दररोज वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.