बजाज फायनान्स कंपनीद्वारे लोन मिळून देण्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या आरोपीस मलकापूर ग्रामीण पोलिसांना पकडण्यात यश
काटी येथील निवृत्ती रोकडे यांची ६ लाख ४८ हजार रूपयांनी केली फसवणूक; आरोपीकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
बजाज फायनान्स कंपनीद्वारे लोण मिळवून देतो असे सांगुण वेळोवेळी ऑनलाईन माध्यमातुन तसेच बँकेन्दारे विवीध खात्यांमध्ये ६,४८,२७४ रुपये पाठवीण्यास सांगून फसवणूक करणा-यास मलकापूर ग्रामीण पोलीसंनी अटक केली आहे, याबाबत अधिक माहिती अशी की, निवृत्ती महादेव रोकडे (यम ४०) रा. काटी ता. नांदुरा यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की १ एप्रिल २०२१ ते ९ ऑक्टोबर २०२१ दरम्यान बसंतकुमार राधाकांत साहु (पम ३० वर्षे) रा. ग्राम कबरु ता. हिंजली जि. गंजाम राज्य ओडीसा रु.मु.अमन नगर चाल कुर्ला (प) याने काज फायनान्स कंपनीद्वारे लोण मिळवून देतो असे सागून वेळोवेळी ऑनलाईन तसेच बँकेद्वारे विविध खात्यांमध्ये तब्बल ६ लाख ४८ हजार २७४ रूपये पाठविण्यास सांगितले.
मात्र लोण मिळवून न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर मलकापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ला पोलीस अधिक्षक सुनिल कदासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. मलकापुर ग्रामीणचे ठाणेदार संदिप काळे यांनी पोउपनी राठोड यांचे नेतृलात पोहेका सचिन दासर, गणेश सुर्यवंशी, संदिप राखोंडे, मपोका वृषाली सरोदे अशी टिम गठीत करुन सदर तपास पत्रकाने ठाणे नगर पोलीस स्टेशन जि. ठाणे येथे जावून आरोपीचा तांत्रीक विश्लेषनाचे मदतीने तसेच पोउपनी राठोड यांचे बंधू पोउपनि गौरव राठोड नेमणूक ठाणे नगर पोलीस स्टेशन यांचे विशेष सहकायाने आरोपीचा ३ दिवस कसोशीने शोध घेवुन त्यास शिताफीने पकडले, त्याच्याकडून १९ जुने वापरते मोबाईल, ३ जुने वापरते लॅपटॉप, १ जुने वापरते कलर प्रिंटर, मोबाईल व लॅपटॉप चार्जर, की बोर्ड, माऊस तसेच इतर इलेक्ट्रॉनीक साहीत्य असा एकूण १ लाख २५ हजाराचा मुददेमाल हस्तगत केला.
तसेच आरोपी चालवत असलेले कॉल सेंटरचा सुध्दा पर्दाफास करुन आरोपीस मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर केले. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदिप काळे हे करत आहेत.