Breaking News
recent

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न



अहमदनगर  (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) :-

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने मार्केट यार्ड चौक येथे साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सोहळा संपन्न झाला. भूमिपूजन कार्यक्रम झाल्यानंतर गायक अजय देहाडे यांच्या भीम संगीताच्या मैफिलीत भीमगीतांवर नाचण्याचा मोह आवरला नाही. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपल्या शहराची भुमी आहे. अनेक दिवसाच्या संघर्षानंतर भारतरत्न डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभा राहत आहे. याचा माझ्यासह हजारो भीमसैनिकांना आनंद होत आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून शेकडो वर्ष बाबासाहेबांचे विचार समाजाला मिळत राहतील. तसेच शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेशीपर्यंत दर्जेदार रस्ता काँक्रीटीकरण करण्याचे काम मार्गी लावले आहे. शहरात ठिकठिकाणी बुद्ध विहार बांधले आहेत. आता भव्यदिव्य असे बुद्ध विहार उभारायचे आहे, त्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची उजळणी तरुण पिढीमध्ये होईल. विकास कामांसाठी संकल्प करावा लागत असून आता आपल्या सर्वांना शहराच्या विकासासाठी वेगाने काम करायचे आहे. लवकरच माळीवाडा वेस येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी प्रा. माणिकराव विधाते यांनी पुढाकार घेतला आहे. शहर विकास कामांमध्ये सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या शहराच्या उन्नतीसाठी काम करावे लागणार आहे.



यावेळी खा. डॉ. सुजय ददा विखे पाटील, आमदार संग्राम जगताप , आयुक्त डॉ. पंकज जावळे, कृती समितीचे नेते अशोक गायकवाड, अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, अमोल गाडे, निखिल वारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, उपायुक्त अजित निकत, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक राहुल कांबळे, सुनील क्षेत्रे, विजय भांबळ, किरण दाभाडे, संजय जगताप, कौशल गायकवाड, बंडू आव्हाड, अशोक खंडागळे, संजय कांबळे, सोमनाथ शिंदे आदींसह आंबेडकर चळवळीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered by Blogger.