पातोंडा येथे अवैध रेती साहित्य जप्त
दिनांक 27/01/2024 रोजी ग्राम पातोंडा येथे अवैध रित्या पूर्णा नदीच्या पात्रातून रेती बाहेर काढण्यासाठी एका ट्रॅक्टरवर वायर रोप व केनी व त्याला रेती उपसण्याकरता असलेले मोठे फावडे असे एकु 370,000/-रु. चे साहित्य मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहे सदर केणीचा ऑपरेटर व ट्रॅक्टर चालक असे पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळून गेले आहेत सदर केणीसह ट्रॅक्टर हे पोलीस स्टेशन नांदुरा येथे आणून जप्त करण्यात आले आहे सदर ट्रॅक्टरचा अहवाल उदईक रोजी मा तालुका दंडाधिकारी साहेब नांदुरा यांचे कार्यालयात दंडात्मक कार्यवाही होणे करिता सादर करण्यात येणार आहे.
सदरची कार्यवाही मा.अपर पोलीस अधिक्षक अशोकजी थोरात साहेब, यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील अपोअसा कार्यालयाचे पोना सुधाकर थोरात, शिवशंकर वायाळ व पोलीस स्टेशन नांदुरा येथील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे