Breaking News
recent

श्रीरामपूरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा जनता दरबार गाजला


    नागरीकांच्या चेहऱ्यावर उमटले समाधानाचे भाव शासन आपल्या दारी कार्यक्रमाची उघडली पोलखोल

श्रीरामपूर -  (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )

श्रीरामपूर :-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर तालुक्यात आयोजित विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या "जनाधिकार जनता दरबारात" आज नागरिकांनी मांडलेल्या समस्या, प्रश्न सुटल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर  समाधानाचे भाव उमटल्याचे दिसले. तर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पोलखोल यामुळे उघड होऊन सरकारचे पितळ उघडे पडले.

 श्रीरामपूर येथे आयोजित जनाधिकार जनता दरबारात आज ४९३ अर्ज प्राप्त झाले. तर २१५ नागरिकांच्या समस्या, प्रश्नांबाबत संबंधित अधिकारी वर्गाशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतः फोनवरून संवाद साधून त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तर काही नागरिकांना संबंधित समस्येसाठी  शिफारस पत्र देण्यात आली असून ऑन द स्पॉट ३९ प्रकरण निकाली काढण्यात यश आले. 

श्रीरामपूर तालुक्यात मोठया प्रमाणात संजय गांधी निराधार योजनेस पात्र असूनही वंचित असलेले नागरिक, धान्यापासून वंचित लाभार्थी, अपंगांच्या समस्या, भूमाफिया, महावितरणाचे प्रश्न,  घरकुल योजनेपासून वंचित नागरिक,  रोजगार , शालेय पोषण  आहार, अकोले येथील अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना निष्कृष्ठ जेवण, सातबारा आदी विषय आले. या जनता दरबारात आलेले प्रश्न, समस्यांचा माझ्या कार्यालयातून पाठपुरावा होत आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सरकारने कोणतेही दिवे लावले नाही. दिव्याखाली अंधार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. जनतेच्या जीवनात काही अंशी उजेड आणण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत असल्याचे दानवे म्हणाले.शेतकऱ्यांविषयी पुतना मावशीच प्रेम सरकार दाखवत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात कांदा उत्पादन होत आहे, मात्र सरकारने गेल्या वर्षी घोषणा करूनही अद्याप कांद्याला अनुदान मिळालं नाही. सरकारने कांदा निर्यातबंदी का केली. सरकार दुटप्पीपणे शेतकऱ्यांना छळण्याचं आणि भाव पाडण्याच काम करतय, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यार्थ्याला आर्थिक मदत

बालसंगोपन निधीच्या लाभासाठी अर्ज करूनही व सरकार दरबारी गेले वर्षभर हेलपाटे  घालूनही कोणतीही मदत मिळत नसल्याची तक्रार १० वी इयत्तेत शिकत असलेल्या त्रिदेव कापसे या विद्यार्थ्याने जनता दरबारात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर केली. 

   मुलाचा इतक्या कमी वयात धीटपणा व चिकाटी बघून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ही भावनिक झाले. त्यांनी मुलाची विचारपूस केली. मात्र त्याने इतर कोणती मदत नको असल्याचे सांगितले. मुलाची शिकण्याची जिद्द व घरची आर्थिक परिस्थिती पाहता दानवे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने त्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी १० हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा हात दिला. शिक्षणा व्यतिरिक्त इतरत्र कुठेही याचा वापर करू नको तसेच दहावीचा निकाल लागला की मला माहिती दे, अशी सुचना त्यांनी केली. यामुळे विद्यार्थीही भावुक झाला. शिक्षणासाठी मदत मिळाल्यामुळे त्यानेही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आभार मानले.यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, विधानसभा संघटक संजय छल्लारे,  उपजिल्हाप्रमुख सचिन बडवे, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर, तालुकाप्रमुख लखन भगत, राधाकिसन बोरकर,शहरप्रमुख रमेश घुले,महिला आघाडी जिल्हा संघटक सपना मोरे, तालुकाप्रमुख लतिका गोपाळे, युवासेना जिल्हाधिकारी नीरज नांगरे,अमित चव्हाण, शहरप्रमुख निखिल पवार व युवतीसेना अधिकारी जिल्हाप्रमुख नेहा लुंड कोकणे उपस्थित होते..

Powered by Blogger.