ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मद्दे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम राबवत साजरा.
श्रीगोंदा प्रतिनिधी -
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हंगाक्लास (बेलवंडी बुद्रुक) तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .शाळा दोन शिक्षकी आहे. विद्यार्थी संख्या 33 आहे. 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळेत स्नेहसंमेलन घेण्यात आले. बाल कलाकारांनी आपल्या अविष्कारामधून विविध कला सादर केल्या. लेझीम ,विनोदी उखाणे, मोमोज कवायत, विविध भाषेतील नृत्य , देशभक्ती गीत, असे विविध कार्यक्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरे करण्यात आले.
पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व एकूण 25 हजार रुपये रोख इन्वर्टर बॅटरी घेण्यासाठी बक्षीस स्वरूपात उत्स्फूर्तपणे दिले. जून पासून पालकांनी शाळेसाठी विविध स्वरूपात देणगी देऊन शाळा रंगरंगोटी ,शाळेसाठी प्रिंटर, लेझीम त्याचप्रमाणे शाळेत विविध भौतिक सुविधांसाठी वस्तू अशी वर्गणी शाळेस दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री एकनाथ शेलार, उपाध्यक्ष सौ रंजना लक्ष्मण लाढाणे,माजी अध्यक्ष श्री.निवृत्ती शेलार व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व पालक वर्ग, महिला भगिनी, बेलवंडी गावचे सरपंच श्री ऋषिकेश शेलार व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य, श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री अनिल शिंदे साहेब , शिक्षणविस्तार अधिकारी श्री बबन वेताळ साहेब, केंद्रप्रमुख श्रीमती शोभा साबळे मॅडम व सर्व पालक वर्ग यांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दळवी रोहिदास यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले .शाळेच्या शिक्षिका श्रीमती शिंदे सुरेखा यांनी उपस्थितांचे आभार मानले.त्याचप्रमाणें सर्व कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टिम उपलब्ध करून दिली श्री घोडेकर राजू तात्याबा यांचे व ओंकार लाढाणे व सचिन लाढाणे यांचे विशेष सहकार्य लाभले.