Breaking News
recent

सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वर पूर्णपणे व सक्तीची बंदी आणा ! त्यानंतरच एक राष्ट्र ,एक निवडणूकवर चर्चा करा ! भाऊसाहेब बावणे

 


नांदुरा  (प्रतिनिधी)

 सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वर पूर्णपणे, सक्तीची बंदी आणा ! त्यानंतरच एक राष्ट्र ,एक निवडणूक वर चर्चा करा असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनसम्राट पार्टीचे अध्यक्ष भाऊसाहेब बावणे भ्रमणध्वनीवरून यांनी केले. एक राष्ट्र ,एक निवडणूक ह्याबाबत स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने दिनांक २ सप्टेंबर २०२३ ला अधिसूचना काढून त्यावर देशातील सामान्य जनतेच्या सदस्यांकडून सूचना मागितल्या होत्या. त्याची मुदत दिनांक १५ जानेवारी २०२४ ला संपत आली आहे . त्याला अनुसरून एक भारताचा सर्वसामान्य नागरिक व पक्षाच्या वतीने आम्ही आमची भूमिका ई-मेल द्वारे भारतीय जनसम्राट पार्टीचे सरचिटणीस राजेश कुमार यांच्या सहीने पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.जगात

सर्व विकसित व प्रगत देशांनी निवडणुकीमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या सर्वसामान्य लोकांमध्ये निवडणुका निष्पक्ष होतात असा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे . कारण आज आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा ईव्हीएम व व्हीव्हीपॅटस वर विश्वास राहिलेला नाही. म्हणून मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेणे हा त्यावर एकच पर्याय आहे. एकदा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाल्यानंतरच एक राष्ट्र, एक निवडणूक वरती चर्चा करता येईल असेही ते पुढे म्हणाले.

Powered by Blogger.