चांदूर बिस्वा रेल्वे स्टेशनवरील विविध समस्या करिता-- रेल्वे प्रबंधकांना निवेदन
चांदुर बिस्वा. ता. नांदुरा मध्य रेल्वे विभागाच्या मुंबई नागपूर अंतर्गत बिस्वा बिस हे रेल्वे स्टेशन असून येथे विविध समस्या प्रवाशांना भेडसावत असून व नागपूर भुसावळ ही पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्यात यावी तसेच अमरावती सुरत मेमो गाडीला या स्थानकावर थांबा मिळावा ई. समस्याची मागणी चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे कार्यालय भुसावल सदर निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनात नमूद आहे की भुसावल नागपूर या लोहमार्गावर बिस्वा ब्रिज रेल्वे स्थानक आहे या स्थानकावर फक्त भुसावळ बडनेरा मेमो व भुसावल वर्धा मेमो गाडी या दोनच गाड्या थांबत आहे उर्वरित वेळेत कोणत्याच गाड्यांचा थांबा नाही. भुसावळ नागपूर पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्यात यावी. अमरावती सुरत मेमो गाडी व महाराष्ट्र एक्सप्रेस ह्या गाड्यांचा या स्टेशनवर थांबा देण्यात यावा तसेच या स्टेशनवर ओव्हर बिज असणे गरजेचे आहे कारण रेल्वे लाईनवर नेहमी मालगाड्या उभ्या असतात त्यामुळे वयवृद्ध प्रवासी महिला लहान मुलांना येण्याचा जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा त्वरित ओव्हार बिज होणे गरजेचे आहे तसेच रेल्वे प्लॉट फ्रार्म ची उंची फारच कमी आहे त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना महिलांना व लहान मुलांना चालताना उतरताना त्रास सहन करावा लागत आहे . प्लॅटफॉर्मची उंची वाढवुन मिळावी. असे म्हटले आहे.