हिंद सेवा मंडळाचे ७१ व्या पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
श्रीरामपूर:- हिंद सेवा मंडळाच्या दादा वामन जोशी नविन मराठी शाळेचा ७१ वा वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ माजी नगराध्यक्ष कु.अनुराधा गोविंदराव आदिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी नगरपालिका शिक्षण समितीचे प्रशासनाधिकरी रमजान पठाण,मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, अजित खुराणा,
माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, भि.रा.खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय साबळे, श्रीमती सुजाता मालपाठक ,दा.वा.जोशी शाळेचे चेअरमन शशिकांत भुतडा,सुशिल गांधी,अनिल कुलकर्णी,प्रविण भंडारी, तुळशीराम गाडेकर, अरुण धर्माधिकारी, डॉ. प्रकाश मेहकरकर,,मुख्याध्यापक सचिन मुळे,,आदिनाथ जोशी ,विठ्ठल शिंदे, नूतन चक्रनारायण, संगीता गायकवाड विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.